मुंबई

आरोप, नाराजी... तरीही कौल नार्वेकरांना

CD

आरोप, नाराजी... तरीही कौल नार्वेकरांना
तिन्ही उमेदवार विजयी; नोटाला दोन हजारांहून अधिक मते
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : एकाच कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना रोखण्याचा आरोप, धमकीचे व्हायरल होणारे व्हिडिओ यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झाेड उठली हाेती. या पार्श्वभूमीवर कुलाब्यातील तीन प्रभागांतील लढत लक्षवेधी ठरली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांच्या कुटुंबातील तिन्ही उमेदवारांना कौल दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी प्रभाग क्रमांक २२६मध्ये १० हजारांहून अधिक मताने विजय मिळवला. या प्रभागात निवडणूक रिंगणात केवळ दोनच उमेदवार आहेत. विरोधी पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्याने सर्वांनी अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना पाठिंबा दिला होता. पवार यांना सात हजार ९९७ मते मिळाली; मात्र या ठिकाणी १,४०४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडत आपली नापसंती दर्शवली. या ठिकाणच्या कोळीवाड्यात मकरंद यांच्याबद्दल अनेक मतदारांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. शेवटच्या टप्प्यात राहुल नार्वेकरांनी ठिकठिकाणी लोकांना भेटून त्यांची नाराजी कमी केल्याचे सांगितले जाते.

प्रभाग क्रमांक २२५मधून राहुल नार्वेकर यांची वहिनी हर्षिता नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजिंक्य धात्रक यांना साडेचार हजार मतांनी पराभूत केले. मुंबईतील सर्वात कमी मतदान झालेल्या नेव्हीनगरच्या प्रभाग क्रमांक २२७ मध्ये राहुल नार्वेकर यांची चुलत बहीण डॉ. गौरवी शिवलकर- नार्वेकर यांनी पाच हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
.....
नार्वेकर कुटुंबाचा विजय
प्रभाग क्रमांक २२५
विजयी उमेदवार : हर्षिता नार्वेकर (भाजप)
मते : ११,३०७
पराभूत उमेदवार : अजिंक्य धात्रक (शिवसेना ठाकरे गट)
मते : ६,४२३
......
प्रभाग क्रमांक २२६
विजयी उमेदवार : मकरंद नार्वेकर (भाजप)
मते : १८,०५८
पराभूत उमेदवार तेजल पवार (अपक्ष) : ७,९९७ मते
‘नोटा’ : १,४०४ मते
......
प्रभाग क्रमांक २२७
विजयी उमेदवार : डॉ. गौरवी शिवलकर-नार्वेकर (भाजप)
मते : ५,१८४
पराभूत उमेदवार : रेहाना शेख (ठाकरे गट)
मते : २,१४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT