मुंबई महापालिका निवडणुकीनंतर अभिनेत्री कंगना राणावत हिचा २०२०मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर तिने उद्धव ठाकरे यांना उद्देशून हा व्हिडिओ व्हायरल केला होता. घर पाडण्याच्या घटनेची आठवण करून देताना अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या कंगना राणावत हिने म्हटले, की मुंबई महापालिकेचा हा निकाल न्यायाचे एक रूप आहे. ज्यांनी मला शिवीगाळ केली, माझे घर पाडले, मला टोमणे मारले आणि महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, त्यांनाच आज महाराष्ट्राने सोडले आहे. मला आनंद आहे, की अशा महिलाद्वेषी, गुंड आणि घराणेशाहीमाफियांना जनता जनार्दन त्यांची योग्य जागा दाखवत आहे.