मुंबई

राज्याचे वातावरण महायुतीच्या बाजुने

CD

राज्याचे वातावरण महायुतीच्या बाजूने
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः मुंबईत बहुमत मिळाले असून, संपूर्ण राज्याचे वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा महापौर बनेल यापेक्षा मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.
राज्यातील महापालिकांचा निकाल लागल्यानंतर ठाण्यात विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभीनाका येथील आनंदाश्रमात आले होते. तेथे पत्रकारांशी संवाद साधताना एकूणच निकालाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक ७५ तर युतीचे एकूण १०३ उमेदवार निवडून आले आहेत. मुंबईतही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, पण शिंदेंशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नसल्याने कमी जागा मिळवूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मात्र, हे श्रेय महायुतीचे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सत्तेऐवजी मुंबई महापालिकेत बदल घडवायचा असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT