मुंबई

प्रदूषणाकडे दुर्लक्ष भोवले

CD

प्रदूषणाकडे दुर्लक्ष भोवले
तारापूरमधील दोन कारखान्यांना नोटीस
बोईसर, ता. १७ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर उपप्रादेशिक कार्यालयाने दोन उद्योगांना संमती अटींचे उल्लंघन केल्याबाबत इशारा नोटीस बजावली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, जिल्हाधिकारी स्तरावर झालेली बैठक तसेच प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी तारापूर येथील विराज प्रोफाइल्स लिमिटेड उद्योगाची पाहणी करण्यात आली असता, उद्योगातून हवेचे लक्षणीय उत्सर्जन होत असल्याचे निदर्शनास आले. तर मनन कॉटसिन प्रा. लि. या उद्योगाच्या पाहणीदरम्यान उद्योगाच्या मागील बाजूस चेंबर/मॅनहोल चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याचे आढळून आले होते. या वेळी चेंबरमधील सांडपाण्याची गुणवत्ता प्राथमिकदृष्ट्या निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दोन्ही कारखान्यांना देण्यात आले आहेत.
---------------------------------------
कठोर कारवाईचे संकेत
दोन्ही प्रकरणांमध्ये जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ व हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ तसेच लागू असलेल्या अन्य पर्यावरणविषयक कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे. या नोटिसींची माहिती प्रादेशिक कार्यालय, ठाणे तसेच संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT