मुंबई

काजू लागवडीने फुलविले ग्रामीण अर्थकारण

CD

काजू लागवडीने फुलविले ग्रामीण अर्थकारण
जव्हारचे ‘काजू’ अर्थकारण
पडीक जमिनीवर फुलले फुलवली बाग; एक हजार हेक्टरवर लागवड
संदिप साळवे ः सकाळ वृत्तसेवा
जव्हार, ता. १७ ः डोंगररांगामध्ये वसलेला जव्हार तालुक्यात शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी आणि रोजगाराची वाणवा अशा परिस्थितीत येथील आदिवासी शेतकऱ्यांनी काजू लागवडीच्या माध्यमातून उत्पनाचा नवा मार्ग शोधला आहे. सध्या सुमारे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर काजूच्या बागा फुलविल्या आहेत. बायफसारख्या संस्थेच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा प्रवास आज जव्हारची नवी ओळख बनली आहे.
जव्हार तालुक्यात बायफसारख्या संस्थेने शेतकऱ्यांना केवळ पारंपारिक पीक न घेता फळबाग लागवड कशी फायदेशीर आहे, याबाबत उल्लेखनीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन काजू, आंबे सारखी कलमे देण्यात आली. ती झाडे वाढविण्याकरीता प्रत्येक शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान देखील देण्यात आले. या भागातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांत उताराच्या, माळरानाच्या आणि पडीक जमिनींवर वेंगुर्ला चार या कलमाची लागवड केली. कमी पाण्यात, नैसर्गिक परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या या पिकामुळे शेतीचा खर्च कमी झाला आणि उत्पन्नाची हमी वाढली. आज अनेक गावांमध्ये काजू म्हणजे केवळ पीक न राहता ‘सोन्यासारखे झाड’ ठरत आहे.

महिला बचत गटांना उत्पन्नाचा स्रोत
काजू तोडणे, सोलणे, वाळवणे, साठवण आणि विक्री या प्रक्रियेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली आहे. विशेषतः महिला बचत गटांनी काजू प्रक्रिया उद्योगात पुढाकार घेतल्याने त्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळत आहे. काही ठिकाणी थेट ग्राहकांपर्यंत काजू पोहोचवण्याचे प्रयोगही यशस्वी ठरत आहेत.

सुधारित लागवड पद्धती
महत्त्वाचे म्हणजे, कृषी विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक युवकांच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी आता सुधारित लागवड पद्धती, रोपांची निगा, कीड व्यवस्थापन आणि बाजारभाव याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि दर दोन्ही वाढताना दिसत आहेत.

जव्हार तालुक्यात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून काजू कलमे तयार करणे, जोपासना करणे व काजू बी तथा काजूगर बाजारात नेऊन विक्री करणे अशा प्रकारचे नियोजन येथील आदिवासी शेतकरी करू लागल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे स्थलांतर थांबले असून कुपोषणही कमी होऊ लागले असल्याचे अनेक ठिकाणी जाणवते.
- गणपत गावंढा, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT