मुंबई

पोयनाडमध्ये राजकीय हालचालींना वेग

CD

पोयनाडमध्ये राजकीय हालचालींना वेग
आंबेपूर मतदारसंघात ‘मिशन जिल्हा परिषद-पंचायत समिती’
पोयनाड, ता. १७ (बातमीदार) ः येत्या ५ फेब्रुवारीला राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर (कुर्डुस) जिल्हा परिषद मतदारसंघ आणि शहापूर पंचायत समिती मतदारसंघात ‘मिशन जिल्हा परिषद व पंचायत समिती’ची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आंबेपूर (कुर्डुस) व शहापूर मतदारसंघातील पोयनाड, कुर्डुस, शहापूर, हाशिवरे या परिसरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले असून, मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी घरोघरी भेटी, चर्चासत्रे आणि आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली, तरी आतापासूनच राजकीय पक्षांनी प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. सध्या विकासकामे, जनतेशी असलेला संपर्क आणि भविष्यातील विकासाचा आराखडा (व्हिजन) या मुद्द्यांवर पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक राहिले असल्याने, प्रचाराची यंत्रणा हळूहळू गतिमान होत आहे. पोयनाड विभागात विविध पक्षांकडून संघटनात्मक बैठका, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. पोयनाड परिसर हा प्रामुख्याने आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट होत असल्याने, यंदा या मतदारसंघात कोणते राजकीय पक्ष उमेदवार उभे करतात आणि लढत दुहेरी की तिरंगी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याच्या स्थितीत शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेत आढावा बैठकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानात उतरायला सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत प्रचार रॅली, जाहीर सभा, रोड शो आणि प्रत्यक्ष प्रचाराच्या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील या हालचालींमुळे आंबेपूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT