मुंबई

शहरप्रमुखाच्या कार्यालयाची तोडफोड

CD

जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर नेरूळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरप्रमुख विजय माने यांच्या कार्यालयाची प्रभागातील विजयी भाजप उमेदवाराच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मतदारही भयभीत झाले होते. या घटनेत एकूण १८ जणांवर नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा उन्माद नको. जनतेची सेवा करा, असा सल्ला मुंबईतून विजयी उमेदवारांना दिला असताना नवी मुंबईत ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात भाजपची सत्ता येऊन संबंधित उमेदवाराच्या पदरात विजय पडला असूनसुद्धा केवळ विरोधक असल्याच्या रागातून कार्यालयाच्या केलेल्या तोडफोडीमुळे नवी मुंबई निवडणूक निकालाला गालबोट लागले.

नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता, शिवाय मंत्री गणेश नाईक यांनी, निवडणूक संपली, शिंदेंशी वैर संपले, असे व्यक्तव्य केले असताना नेरूळ येथे भाजप उमेदवाराच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रकाराने परिसरात घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोषादरम्यान काही कार्यकर्त्यांनी शिवसेना उमेदवाराच्या कार्यालयात घुसून काचफोड व साहित्याची नासधूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

SCROLL FOR NEXT