मुंबई

जिल्ह्यात झाला स्वच्छतेचा जागर

CD

जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर
ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्रांचा सहभाग
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी शुक्रवारी (ता.१६) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सात हजार ९९८ किलो प्लास्टिक व सुका कचरा गोळा करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे व स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी माणगाव तालुक्यातील वरचीवाडी व तळाशेत येथे स्वच्छता अभियानात सहभाग घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन
समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यात सामूहिक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्लास्टिक व सुका कचरा गोळा करण्यात आला. या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येणार आहे, असे ग्रमपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सात हजार ९९८ किलो कचरा गोळा
जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, उपकेंद्र असे मिळून एकूण २० हजार २८१ अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थांनी हे स्वच्छता अभियान राबविले. यातून सात हजार ९९८ किलो कचरा गोळा करण्यात आला असून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT