रक्तदान, डोळे तपासणी शिबिर
मुंबई, ता. १७ ः माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दादर-नायगांव संलग्न परिसर यांच्यातर्फे रविवारी (ता. १८) सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजता महागणपती श्री नायगांवेश्वर पटांगण, शिवसेना शाखेच्या बाजूला, प्रकाशानंद हॉटेलसमोर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, दादर पूर्व येथे हे शिबिर पार पडणार आहे.