पालिकेत मुस्लिम प्रतिनिधित्व घटले
तीनची घसरण; काँग्रेसचे १४, एमआयएमचे सात नगरसेवक
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महापालिका निवडणुकीत मुस्लिम महापौराच्या मुद्द्यावरून भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणजे या वेळी मुस्लिम समाजाचे पालिकेतील प्रतिनिधित्व तीनने घटले आहे. या वेळी मुंबई महापालिकेत एकूण २८ मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. गेल्या पालिकेत ३१ मुस्लिम नगरसेवक होते. काँग्रेसचे सर्वाधिक १४, तर त्यापाठाेपाठ ‘एमआयएम’चे सात नगरसेवक विजयी झाले आहेत.
गेल्या वेळी चार मुस्लिम चेहरे देणाऱ्या भाजपने या वेळी एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही. मुंबईत मुस्लिम समाजाची १९ ते २० टक्के आहेत. जवळपास ५० ते ५५ प्रभागांतील निकाल मुस्लिम समाज ठरवतो; मात्र २०१७च्या तुलनेत या वेळी समाजाचे प्रतिनिधित्व तीनने घटले आहे. २०१७मध्ये ३१ मुस्लिम चेहरे पालिकेत निवडून गेले हाेते. ही संख्या २८वर आली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीच्या रिंगणात या वेळी मुस्लिम समाजाचे उमेदवार कमी होते.
काँग्रेस, एमआयएम आघाडीवर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे या वेळी एकूण २४ उमेदवार विजयी झाले. यामध्ये मुस्लिम उमेदवारांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे १४ एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर एमआयमचे तब्बल सात मुस्लिम चेहरे जिंकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ठाकरेंची शिवसेना आहे. या वेळी मशाल या चिन्हावर दाेन मुस्लिम चेहरे विजयी झालेत. नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीकडून आणि समाजवादी पक्षाकडून प्रत्येकी दोन उमेदवार विजयी ठरलेत. महायुतीचा भाग असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक मुस्लिम चेहरा या वेळी पालिकेत असणार आहे.
मुस्लिमबहुल भाग
मानखुर्द-शिवाजीनगर, गोवंडी, मुंबादेवी, भायखळा, माझगाव, माहीम, बेहरामपाडा, चिका कॅम्प, मालाड, मालवणी, जोगेश्वरी, अणुशक्तीनगर, कुर्ला, वडाळा या भागात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहे.
मुस्लिम विजयी उमेदवार
काँग्रेस : १४
एमआयएम : ७
शिवसेना (ठाकरे) : २
शिवसेना : १
समाजवादी पक्ष : २
राष्ट्रवादी काँग्रेस : २
..
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
- काँग्रेसचा मुस्लिम समाजातला प्रभाव कायम
- सपच्या बालेकिल्यात एमआयएमची मुसंडी
- नवाब मलिकांचा प्रभाव घटला
- एमआयएमचे तीन हिंदू उमेदवार
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.