सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : पनवेल महापालिकेत महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता हे प्रमुख पद कोणाला मिळणार, याबाबत चुरस निर्माण झाली आहे. विरोधी बाकावर प्रमुख पदावर पुरुष की महिला बसणार, या चर्चांना उधाण आले आहे.
भाजपसारख्या बलाढ्य पक्षासमोर लढणाऱ्या महाविकास आघाडीला ७८ पैकी १८ जागांवर यश मिळाले आहे. यात शेकापला नऊ जागा, ठाकरे गटाला पाच जागा आणि काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गटातील लीना गरड यांनी लावून धरलेला मालमत्ता कराचा मुद्दा अधिक प्रभावी ठरला. त्यांनी मालमत्ता कराविरोधात सुरू केलेली लढाई महापालिकेपुरती मर्यादित न ठेवता अगदी उच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेल्या. अनेक वेळा वकिलांची फौज तैनात करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
खारघरसारख्या मोठ्या नोडमध्ये त्यांच्याकडे चांगला जनाधार आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझावात असताना त्यांनी ठाकरे गटाच्या पाच जागा जिंकून आणण्याची किमया दाखवली. महापालिकेच्या सभागृहात वक्तृत्व, अभ्यास आणि हजरजबाबी असल्यामुळे लीना गरड या विरोधी पक्षनेते पदाच्या प्रबळ दावेदार ठरतात. तसेच पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्या ठरू शकतात.
शेकापकडे जास्त जागा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे जाऊ शकते. शेकापमध्ये सलग दोन वेळा जिंकून आलेले अरविंद म्हात्रे हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात. काँग्रेसमध्ये हरेश केणी हे विरोधी पक्षनेतेपदासाठी दावेदार मानले जात आहेत. शेवटी या पदाकरिता महाविकास आघाडीकडून या चेहऱ्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.