मुंबई

(मुंबई टुडेसाठी)आधुनिक समाजात सफाई कामगारांचे सर्वांत गंभीर प्रश्न

CD

सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक मानसिकतेत बदल आवश्यक
बेझवाडा विल्सन यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. १९ : मुंबईसह देशभरातील सफाई कामगारांचे प्रश्न हा आधुनिक समाजातील सर्वात गंभीर विषय आहे. केवळ कायदे करून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी समाजाच्या मानसिकतेत मूलभूत बदल होणे काळाची गरज आहे, असे मत सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेझवाडा विल्सन यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, अनुसंधान ट्रस्ट आणि सेहत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १७) कलिना संकुलात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य, मानवी हक्क आणि घटनात्मक मूल्ये या विषयावर विल्सन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सफाई कामगारांच्या सुविधा, आरोग्य आणि निवाऱ्याचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि मानवी प्रतिष्ठा यांचा जाती व श्रमाशी असलेला संबंध सामाजिक चळवळींच्या अनुभवातून मांडण्यात आला. या चर्चेमुळे संशोधक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या गंभीर विषयाकडे पाहण्याची एक नवीन आणि मानवी दृष्टी मिळाली.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुसंधान ट्रस्टच्या डॉ. विभूती पाटील यांनी संस्थेचा परिचय करून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. मनीषा करणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक डॉ. रवि दुग्गल यांनी सार्वजनिक आरोग्य आणि मानवी हक्क यांमधील परस्परसंबंध स्पष्ट करीत व्यावहारिक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सुमेध पारधे, राशी बग्गा यांच्यासह अनेक प्राध्यापक, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

काळजाला भिडणारी घटना! ज्या वडिलांनी हात धरून चालायला शिकवलं, त्यांनाच पोत्यात भरून पार्सल करण्याचा मुलीचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Zp Election : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाची परंपरा कायम, उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विवेक वळसे पाटील

SCROLL FOR NEXT