मुंबई

वडिलोपार्जित जमिनींवर कब्जा

CD

वडिलोपार्जित जमिनींवर कब्जा
बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात आदिवासींमध्ये संताप
कासा, ता. १८ (बातमीदार)ः बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींच्या पारंपरिक धार्मिक, वडिलोपार्जित जमिनी बळकावल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांवर पोलिस बंदोबस्ताच्या जोरावर दडपशाही करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मौजे वणई माच्छीपाडा येथील सर्वे क्रमांक ३३३, ३४०, ३४१ व ३५३ मधील जमीन पिढ्यानपिढ्या जतन केलेली आहे. आदिवासी समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक श्रद्धेशी निगडित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जमिनीची कोणतीही अधिकृत मोजणी न करता भूसंपादन विभागाने थेट काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासकीय यंत्रणा व एल अँड टी कंपनीच्या ठेकेदारामार्फत बुलेट ट्रेनचे काम मनमानी पद्धतीने सुरू करण्यात आले असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. या कारवाईदरम्यान भूसंपादन प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त घेऊन ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप केला आहे.
--------------------------------
सांस्कृतिक अस्मिता नष्ट
विकासाच्या नावाखाली आदिवासी समाजाचे अस्तित्व, श्रद्धास्थाने, परंपरा, सांस्कृतिक अस्मिता नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच विकासाला विरोध नाही; मात्र तो आदिवासींच्या हक्कांवर, श्रद्धांवर, अस्तित्वावर घाला घालून नको, अशी ठाम भूमिका असल्याचा मौजे वणई माच्छीपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सुमडा यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT