मुंबई

''मलंगगड फ्युनिक्युलर'' सेवा सुरू

CD

‘मलंगगड फ्युनिक्युलर’ सेवा सुरू
आमदार किसन कथोरे, सुलभा गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण
डोंबिवली, ता. १८ : अंबरनाथ तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगडावर जाण्यासाठी आता कष्टप्रद पायपीट करावी लागणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि बहुप्रतीक्षित असलेला श्री मलंगगड फ्युनिक्युलर रोप-वे प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. रविवारी भाजप आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले.

२००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व करताना या प्रकल्पाची संकल्पना मांडली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रकल्पाला मंजुरी दिली, तर छगन भुजबळ यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले होते, तर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली; मात्र मतदारसंघाची पुनर्रचना आणि प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्प रखडला. महायुती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याने रखडलेल्या कामाला वेग आला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र, प्रत्यक्ष लोकार्पण सोहळ्याला त्यांची अनुपस्थिती दिसून आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ
देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर सेवा म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. वृद्ध, लहान मुले आणि हजारो भाविकांना आता गडावर जाणे सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे मलंगगड परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक नागरिकांच्या आर्थिक विकासाचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
प्रकल्पाचे नाव : श्री मलंगगड फ्युनिक्युलर प्रकल्प
लोकार्पण : १८ जानेवारी २०२६
खासियत : देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर सेवा
फायदा : गडावरील पायपीट वाचणार, पर्यटनात वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT