मुंबई

मोतीबिंदू रुग्णांना मोफत गॉगल वाटप

CD

मोतीबिंदू रुग्णांना मोफत गॉगलवाटप
माणगाव, ता. १८ (वार्ताहर) : संजना संतोष खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या ५० रुग्णांना संरक्षणात्मक गॉगलचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर दृष्टीचे योग्य संरक्षण मिळाले.
शस्त्रक्रियेनंतर आवश्यक साधन सामग्री अनेक रुग्णांना सहज उपलब्ध न होण्याच्या समस्येची दखल घेऊन खाडे परिवाराने हा संवेदनशील उपक्रम हाती घेतला. गॉगल मिळाल्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक स्पष्टपणे दिसून आली.
वाटपावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक करत, अशा मदतीमुळे रुग्णांना साहित्यिक सहाय्यासोबत मानसिक आधारही मिळतो, असे नमूद केले.
राज खाडे, जय खाडे व संपूर्ण खाडे परिवाराच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम वाढदिवस साजरा करण्याचा प्रेरणादायी सामाजिक आदर्श ठरला असून, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

फोटो ओळ - माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू रुग्णांना गॉगलचे मोफत वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT