मुंबई

मुलुंडमध्ये शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन

CD

मुलुंडमध्ये शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन

मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : मुलुंडमध्ये स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या दुसऱ्या स्मृतिवर्ष प्रीत्यर्थ शनिवारी (ता. २४) स्वरश्री संगीत महाविद्यालयातर्फे ‘सुरसमर्पण’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी वीणा शुक्ल, डॉ. चेतना पाठक, श्रुती गोखले, नीलिमा पुराणिक, स्मिता वाघ, नंदकुमार पाटील आणि पंडित डॉ. विकास कशाळकर हे गायक कलाकार अनवट, अवेळ आणि जोडरागांची मैफल सादर करणार आहेत.
कार्यक्रमात सूरदुर्गा फाउंडेशनचे उद्घाटन तसेच पंडित विकास कशाळकर यांचा पंच्याहत्तरी निमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड पूर्व येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सभागृहात शनिवारी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत करण्यात आले असून सूरसमर्पण ही शास्त्रीय संगीताची मैफल या वेळी रंगणार आहे. कार्यक्रमात आदित्य पानवलकर आणि ऋषिकेश सुरवसे तबल्यावर संगत देतील, तर हार्मोनियमवर भक्ती ब्रह्मे घैसास आणि विनय दळवी यांची साथ मिळणार आहे, असे डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आणि स्वरश्री संगीत महाविद्यालयाच्या संचालिका वीणा शुक्ल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT