मुंबई

‘आॅपरेशन लोटस’चा धसका

CD

‘आॅपरेशन लोटस’चा धसका
वसई-विरारमध्ये नगरसेवक पळवापळवीच्या चर्चा
वसई, ता.१८ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेत सत्ता स्थापनेसाठी बविआच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचा बडा मोठा नेता कामाला लागला असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर आहे. या प्रकारामुळे वसई-विरारमध्येही अॉपरेशन लोटस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसई-विरार महापालिकेत ७१ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपकडे ४४ जागा आहेत. तर शिंदे गटाला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे बविआने सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीला १४ जागांची गरज आहे. त्यामुळे वेगळा गट करण्यासाठी नगरसेवक फोडले जातील, अशी चर्चा समाजमाध्यमवर रंगू लागली आहे. यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आला असूनमोठा नेता काम करत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे महायुती सारीपाटाचा नवा राजकीय डाव खेळणार असून हितेंद्र ठाकूर कोणती रणनीती आखणार, याकडे लक्ष लागले आहे.
------------------------------------
उलथापालथची शक्यता
राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी जरी बहुमत बविआकडे असले तरी पडद्यामागे विविध हालचाली सुरु असल्याची म्ंहटले जात आहे. तर विधानसभेनंतर महापालिका काबीज करून राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-----------
वसई-विरार शहराच्या मतदारांनी बहुजन विकास आघाडीला निवडून दिले आहे. विकासासाठी आमचे नगरसेवक तत्पर आहेत. फोडाफोडीचे राजकारण होता कामा नये. जनता अशांना माफ करणार नाही.
- हितेंद्र ठाकूर, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT