मुंबई

कुठे हजारोंची आघाडी, कुठे अवघ्या ३२७ मतांनी विजय

CD

प्रभाग क्रमांक तीनमध्ये अटीतटीची लढत
कुठे हजारोंची आघाडी, कुठे अवघ्या ३२७ मतांनी विजय
टिटवाळा, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीनमधील निकालांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या प्रभागात शिवसेना, भाजप, मनसे आणि ठाकरे गट यांच्यात चौरंगी आणि अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या.
प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये शिंदे गटाचे बंदेश जाधव यांनी १३ हजार ३३१ मते मिळवत मनसेचे भूषण जाधव यांचा ११ हजार ३२२ मतांवर पराभव केला. या लढतीत बंदेश जाधव यांनी दोन हजार नऊ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय नोंदवला. सुरुवातीपासूनच या जागेवर चुरस दिसून येत असली तरी अंतिम फेरीत शिंदे गटाचा उमेदवार विजयी ठरला, तर प्रभाग क्र. तीन ब मध्ये शिंदे गटाच्या हर्षल चौधरी यांनी १२ हजार ७७१ मते मिळवत मनसेच्या ज्योती आभाळे यांचा पराभव केला. ज्योती आभाळे यांना ११ हजार ११ मते मिळाली.
प्रभागातील सर्वाधिक लक्षवेधी आणि अटीतटीची लढत बीसीसी प्रभाग क्र. तीन क जागेवर भाजपच्या उपेक्षा भोईर यांनी १४ हजार ३८० मते मिळवली, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाच्या सुषमा पाटील यांना १४ हजार ५३ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये केवळ ३२७ मतांचा फरक राहिला होता. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत या जागेवर थरार कायम होता.
प्रभाग क्र. तीन ड सर्वसाधारण जागेवर भाजपचे संतोष तरे यांनी १२ हजार १४२ मते मिळवत ठाकरे गटाच्या प्रदीप भोईर यांचा ३८९ मतांनी पराभव केला. प्रदीप भोईर यांना ११ हजार ७५३ मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT