मुंबई

दोन दिवसांत एकही अर्ज दाखल नाही

CD

उरण, ता. १८ (वार्ताहर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून आता प्रक्रियेला वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आविशकुमार सोनोने यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसंदर्भातील प्रशासकीय कामकाज बोकडविरा येथील प्रकल्पग्रस्त सिडको प्रशिक्षण केंद्रामध्ये पार पडणार आहे. १६ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, मात्र विविध राजकीय पक्षांकडून आतापर्यंत २५ अर्ज घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तालुक्यात १३५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आविशकुमार सोनोने आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक पथके तैनात करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व क्षेत्रीय देखरेखीसाठी १५ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेवर नजर...
उमेदवारी अर्ज भरणे १६ ते २१ जानेवारी
अर्जांची छाननी २२ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी
मतदान ५ फेब्रुवारी
मतमोजणी ७ फेब्रुवारी


एकूण मतदारसंख्या १,०८,५२०
पुरुष ५२,८७३
महिला ५५,६४५
तृतीयपंथी २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT