मुंबई

भाजपा उमेदवारांची वाढली जबाबदारी

CD

भाजप उमेदवारांची वाढली जबाबदारी
खारघर, ता. १८ (वार्ताहर) : खारघर परिसरात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्राप्त केलेल्या बहुमतामुळे येथे स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. वेगाने विकसित होत असलेल्या या उपनगरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आता विजयी नगरसेवकांवर विकासकामे, नागरी सुविधा आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आली आहे.
पनवेल महापालिकेतील सर्वात मोठा नोड असलेल्या खारघरमध्ये मेट्रो, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, पांडवकडा धबधबा आणि कॉर्पोरेट पार्क यामुळे शहराची ओळख देशभर पोहोचली आहे. प्रथम निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांनी विशेष विश्वास दर्शवत १२ पैकी १० भाजप उमेदवारांना विजयी केले. प्रचारादरम्यान रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारख्या विषयांवर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे.
पाणीटंचाई, पार्किंग, प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनासह तंत्रज्ञानाधारित सेवा सुविधांचे आव्हान नगरसेवकांसमोर असून, नागरिकांची अपेक्षा ‘नियोजित आणि सक्षम विकासा’ची आहे.

कोट:
“लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यामुळे खारघरवासीयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमधील विकासकामांना गती देऊ,”
- मधू पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक, प्रभाग क्र. ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT