महाराष्ट्राची वीजगाथा
वाढती मागणी, बदलती ऊर्जा
औद्योगिकीकरणाचा वेग, शेतीसाठी वाढती विजेची मागणी आणि झपाट्याने विस्तारत असलेले शहरीकरण या सर्व प्रक्रियांमुळे राज्यातील विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक विजेचा वापर करणाऱ्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राने स्वातंत्र्यानंतर जलविद्युत व औष्णिक प्रकल्पांच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा पाया मजबूत केला; मात्र बदलत्या हवामान परिस्थिती, इंधन मर्यादा आणि पर्यावरणीय आव्हानांमुळे आता राज्याचा ऊर्जा प्रवास नव्या वळणावर आला आहे. सौर, पवन आणि स्वच्छ ऊर्जेकडे झुकणारी धोरणे केवळ पर्याय न राहता गरज बनत असून, पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राची दिशा ठरवणारा निर्णायक टप्पा सुरू झाला आहे. सध्या राज्याच्या ऊर्जानिर्मितीत बदल घडत असून सौर, पवन व स्वच्छ ऊर्जेकडे कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या वीजनिर्मितीचा इतिहास, सध्याची परिस्थिती आणि पुढील पाच वर्षांत ऊर्जा क्षेत्रातील दिशा समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
महावितरण ग्राहक संख्या (वीज वापर टक्क्यांमध्ये)
घरगुती ग्राहक - २ कोटी ३३ लाख १८.८७
वाणिज्य - २२ लाख ७८ हजार ६.५५
औद्योगिक ग्राहक - ४ लाख ४३ हजार ४३.७३
कृषी - ४७ हजार ९७ हजार २६.४९
इतर - ३ लाख ८७ हजार ४.३६
एकूण वीज ग्राहक - ३ कोटी १२ लाख - (वार्षिक वीज वापर - १ लाख ४५ हजार दशलक्ष युनिट)
राज्याची एकूण वीजनिर्मिती क्षमता (मेगावॉटमध्ये)
- महानिर्मिती - १३,८८०
- केंद्राकडील वाटा - ७,०८६
- जेएसडब्ल्यू जयगड - ३००
- जीएमआर - २००
- सीजीपीएल मुंद्रा - ७६०
- अदाणी महाराष्ट्र लिमिटेड, तिरोडा - ३,०८५
- रतन इंडिया लिमिटेड - १,२००
- साई वर्धा पॉवर जनरेशन - २४०
- इतर जलविद्युत प्रकल्प - ४७९
- अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प - १०,९७६
- मुंबईत टाटा पॉवर - २,५४१
- अदाणी डहाणू - ५००
- एकूण ४०,७५१
राज्यभरातील छतावरील सौरऊर्जा प्रकल्प
लघु दाब
- ग्राहक संख्या : ५,४२,९११ (क्षमता - ३,०५५ मेगावॉट)
उच्चदाब
- ग्राहक संख्या : ४,७८४ (क्षमता - १,४२३ मेगावॉट)
महानिर्मिती एकूण वीजनिर्मिती क्षमता १३,८८० मेगावॉट
प्रकल्पाचा प्रकार संख्या क्षमता
- औष्णिक वीज प्रकल्प - ७ - १०,२००
- उरण वायू वीज केंद्र - - ६७२
- जलविद्युत प्रकल्प - २५ २,५८०
मुंबईतील वीज ग्राहक
- बेस्ट - १२ लाख
- अदाणी इलेक्ट्रिसिटी - २८ लाख
- टाटा पॉवर - ८ लाख
मुंबईची विजेची कमाल मागणी - ४,२०० मेगावॉट
प्रारंभिक काळ (१९००-४७)
१८९७ मध्ये मुंबईत (तत्कालीन बॉम्बे प्रांत) प्रथम वीज वापरात आली
टाटा समूहाने १९०७ मध्ये खोपोली येथे जलविद्युत प्रकल्प सुरू केला
हाच महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प मानला जातो
- भिवपुरी (१९१९) आणि भिरा (१९२७) येथे जलविद्युत प्रकल्पांची उभारणी
सुरुवातीला वीज प्रामुख्याने मुंबईतील गिरण्या, रेल्वे आणि औद्योगिक वापरासाठी होती
स्वातंत्र्यानंतरचा विस्तार (१९४७-६०)
औद्योगिकीकरणामुळे विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ
१९४८ : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची (एमएसईबी) स्थापना
ग्रामीण भागात वीज वितरणास सुरुवात
याच काळात कोळसा-आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पांचा पाया घातला गेला
सुधारणा व खासगीकरणाचा काळ (१९९०-२०१०)
वीज क्षेत्रात सुधारणा व पुनर्रचना
‘एमएसईबी’चे विभाजन (२००५)
- महाजनको (वीजनिर्मिती)
- महावितरण (वीज वितरण)
- महापारेषण (वीज वहन)
खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग
गॅस-आधारित वीज प्रकल्प सुरू झाले (उदा. दाभोळ)
१) महाजेनको
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी लि. ही राज्याची मुख्य वीजनिर्मिती संस्था आहे. औष्णिक (कोळसा), जलविद्युत, वायू व नवीकरणीय ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करते.
२) महावितरण
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ही राज्यातील बहुतांश भागात घरगुती, औद्योगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा व बिलिंग-वसुली करते.
३) महापारेषण
महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनी लि. ही उच्चदाब वीज वाहिन्या, उपकेंद्रे आदींच्या माध्यमातून निर्मिती केंद्रांमधून वीज वितरण कंपन्यांपर्यंत वीज पोहोचवण्याचे काम करते.
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर (१९६०-९०)
१ मे १९६० : महाराष्ट्र राज्याची स्थापना
मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युत प्रकल्पांची उभारणी
कोराडी
खापरखेडा
परळी
नाशिक (एकलहरे)
जलविद्युत प्रकल्प
कोयना जलविद्युत प्रकल्प (१९६४)
याच कालावधीत महाराष्ट्र वीज उत्पादनात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक बनला.
प्रमुख वीजनिर्मिती स्रोत
औष्णिक (कोळसा आधारित)
जलविद्युत
गॅस
सौरऊर्जा
पवन ऊर्जा
महानिर्मितीची स्थापित क्षमता १३,८८०.५५ मेगावॉट आहे. यामध्ये औष्णिक विद्युत (जवळपास ७३.५ टक्के, म्हणजेच १०,२०० मेगावॉट आणि उरण येथील वायूआधारित निर्मिती केंद्रांचा समावेश आहे, ज्याची स्थापित क्षमता ६७२ मेगावॉट आहे. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांची रचना, उभारणी आणि कार्यान्वित करण्यात आले ते महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग (डब्ल्यू.आर.डी.) मार्फत ते कार्यान्वित झाल्यानंतर, हायड्रो प्रकल्प संचालन आणि देखभालीसाठी महानिर्मितीला दीर्घकालीन भाडेपट्टीवर सुपूर्द करण्यात आले. सध्या २५ जलप्रकल्प आहेत, त्यांची क्षमता २५८०.२ मेगावॉट आहे.
महानिर्मितीला स्थापित क्षमता (२५-०८-२०२५ रोजी)
अ) कोळशावर आधारित औष्णिक वीज केंद्रे
विद्युत केंद्र स्थापित क्षमता (मेगावॉटमध्ये)
कोराडी २,१९०
नाशिक ६३०
भुसावळ १,८७०
पारस ५००
परळी ७५०
खापरखेडा १,३४०
चंद्रपूर २,९२०
महानिर्मितीची एकूण औष्णिक विद्युत क्षमता १०,२००
ब) वायू विद्युत केंद्र क्षमता (मेगावॉटमध्ये)
उरण वायू विद्युत ४३२
डब्ल्यू.एच.आर. २४०
वायू विद्युत एकूण क्षमता ६७२
क) जलविद्युत केंद्र
कोयना (टप्पा १, २, ३, ४ तसेच धरण पायथा) १,९५६
इतर लहान जलविद्युत प्रकल्प ३७४.२
घाटघर पंपसाठा २५०
एकूण जलविद्युत क्षमता २५८०.२
ड) सौरऊर्जा केंद्रे
चंद्रपूर, शिवाजीनगर, साक्री, बारामती, कौडगाव २८०.३३
सीएमएजीएफअंतर्गत सौर प्रकल्प १४८.०२
महानिर्मिती एकूण (अ+ब+क+ड) १३,८८०.५५ मेगावॉट
स्रोत : महाजेनको
महानिर्मितीचे उभारणी चालू असलेले प्रकल्प
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र संच क्र. ६ : ६६० मेगावॉट
कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प : १,३२० मेगावॉट
कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राकरिता कोळसा वहनासाठी पाइप कन्व्हेअर योजना
प्रदूषण नियंत्रक संयंत्र उभारणी प्रकल्प :
नियोजित औष्णिक केंद्रे
चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प (८०० मेगावॉट)
पारस औष्णिक विद्युत प्रकल्प (८०० मेगावॉट)
भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्प (८०० मेगावॉट)
प्रस्तावित नूतनीकरण आणि आधुनिकीकरण
केंद्रीय विद्युत प्राधिकरण, भारत सरकार यांच्या निर्देशांच्या अनुषंगाने महानिर्मितीने जुन्या संचांचे (१७ संच- एकूण क्षमता ४६०० मेगावॉट) नूतनीकरण आणि आधुनिकीकरण/कार्यकाळ विस्ताराचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरविले आहे. या संचांपैकी महानिर्मितीद्वारा सध्या, टप्पा-१ व २ अंतर्गत ६ जुन्या संचाने नूतनीकरण आणि आधुनिकीकरण/कार्यकाळ विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे.
अनु .क्र. टप्पा व कार्यकाळ औ. वि. के. संच क्षमता (मे.वॉ.) एकूण (मे.वॉ.)
१ टप्पा-१ चंद्रपूर ३ २१० १०५०
नाशिक ३ व ४ २ x २१०
नाशिक ५ २१०
भुसावळ ३ २१०
२ टप्पा-२ चंद्रपूर ४ २१० २१०
एकूण ६ संच १२६०
एकूण १४,४०० मेगावॉट वीजनिर्मितीसह हे भारतातील सर्वात मोठे वीज उत्पादक प्रकल्प आहे, जे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. महानिर्मितीद्वारे निर्माण होणारी वीज महाराष्ट्राला पुरवली जाते. ते ६ जून २००५ पर्यंत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा एक भाग होते.
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या पूर्वीच्या इतिहासाची पुनर्रचना करण्याच्या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय कंपनी कायदा १९५६ अंतर्गत हे समाविष्ट करण्यात आले आहे. जून २००५ मध्ये महाजेनकोची स्थापना करण्यात आली.
भारतातील सर्व राज्य वीजनिर्मिती कंपन्यांमध्ये महाजेनकोची एकूण उत्पादन क्षमता सर्वाधिक आहे आणि ती सर्वाधिक औष्णिक स्थापित क्षमता आहे. स्थापित क्षमतेच्या बाबतीत, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड नंतर ही दुसरी सर्वात जास्त उत्पादन कंपनी आहे. महाजेनको ही एकमेव राज्य उपयुक्तता आहे, ज्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्पासह औष्णिक, जलविद्युत आणि गॅस स्टेशनचा अतिशय संतुलित उत्पादन आहे.
गॅस-आधारित औष्णिक वीज केंद्रे
उरण गॅस टर्बाइन पॉवर स्टेशन ६७२ मेगावॉट
जलविद्युत केंद्रे क्षमता
भाटघर
भातसा
भिरा
डिंभे धरण
घाटघर पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प
कान्हेर धरण
कोयना जलविद्युत प्रकल्प
माणिकडोह धरण
पानशेत धरण
पवना धरण
सूर्या धरण
तिलारी धरण, चंदगड
उजनी धरण
लोअर वैतरणा धरण
वरसगाव धरण
वीर धरण
वारणा धरण
येलदरी धरण
..
महाजेनको
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची उपकंपनी
उद्योग वीजनिर्मिती
स्थापना केली ६ जून २००५ (एमएसईबीचे तीन भाग करण्यात आले तेव्हा)
मुख्यालय वांद्रे, मुंबई
देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री, अध्यक्ष
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - राधाकृष्णन बी.
उत्पादने वीज
महसूल अंदाजे ७,४०० कोटी
कर्मचाऱ्यांची संख्या १५,०००
पालक महाराष्ट्र राज्य वीज मंडळ
महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना २.०’ अंतर्गत मार्च २०२६ पर्यंत १६,००० मेगावॉट सौरऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ठळक मुद्दे ः
- शेतकऱ्यांना दिवसा, अखंड वीजपुरवठा मिळावा, हा मुख्य उद्देश
- कृषी पंपांसाठी स्वतंत्र सौर वीजवाहिन्या उभारण्यावर भर
- वीज खंडित होणे, कमी दाब अशा तक्रारींना आळा
- डिझेल व पारंपरिक विजेवरील अवलंबन कमी
- पर्यावरणपूरक, कार्बन उत्सर्जनात घट
योजना २.० मध्ये काय वेगळं?
अधिक क्षमतेचे सौर प्रकल्प
वेगवान अंमलबजावणी
जास्तीत जास्त कृषी फिडर्सचा समावेश
आकडेवारी एक नजर
राज्यातील सुमारे ३० हजार मेगावॉट इतका कृषी वीजभार
योजनेअंतर्गत ७ ते ८ हजार मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट
पहिल्या टप्प्यात हजारो कृषी फिडर्स सौरऊर्जेशी जोडले जाणार
लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ होण्याची अपेक्षा
या योजनेमुळे रात्रीच्या सिंचनाची अडचण दूर होऊन दिवसा शेतीकामे करणे शक्य होणार आहे.
राज्यातील कृषीप्रधान जिल्ह्यांना या योजनेत प्राधान्य
- पश्चिम महाराष्ट्र : सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर
- मराठवाडा : बीड, लातूर, धाराशिव, नांदेड
- विदर्भ : यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा
- उत्तर महाराष्ट्र : जळगाव, धुळे, नंदुरबार
या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सौर वीजवाहिन्या कार्यान्वित करण्यात येणार असून पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. योजनेमुळे डिझेल जनरेटर व पारंपरिक विजेवरील अवलंबन कमी होणार असून पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढणार आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसह हरित ऊर्जेच्या दिशेने राज्याची वाटचाल अधिक वेगवान होणार आहे.
इतर वीजपुरवठा करणारी कंपन्या
टोरंट पॉवर - मुंबई महानगरपर्यंत काही भागात वीज वितरण (उदा. भिवंडी, शिळ, मुंब्रा-कळवा परिसरात)
बेस्ट - मुंबईतील पारंपरिक वीज वितरण
अदाणी पॉवर - वीज वितरण आणि पुरवठा
टाटा पॉवर- वीज वितरण व काही उत्पादन प्रकल्प
रिलायन्स - वीज उत्पादन तसेच वितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.