नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल
म्हसरोली गावात सफेद कांदा लागवडीला सुरुवात
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली गावात सफेद कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने, प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे.
विक्रमगड तालुका शेतीतील नवनवीन प्रयोगांसाठी पालघर जिल्ह्यात केंद्रबिंदू ठरत आहे. फुलशेती, हळद, भाजीपाला, तूती, सूर्यफूल पिकांबरोबर सफेद कांद्याची लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे. म्हसरोलीत आठ-नऊ वर्षांपासून सफेद कांद्याची लागवड केली जाते. यंदा १३० शेतकऱ्यांनी १४० ते १५० एकरवर सफेद कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन येण्याची शक्यता आहे.
----------------------------
बाजारात चांगला भाव
- मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर आदी शहरी बाजारपेठांमध्ये सफेद कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांऐवजी अधिक नफा देणाऱ्या या पिकाकडे शेतकरी वळले आहेत.
- सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे आणि पाण्याचे योग्य नियोजनाचा वापर केला आहे. यामुळे एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रतीचा कांदा मिळाल्यास प्रतिमाळ १०० ते १२० रुपयांचा भाव मिळू शकतो, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
----------------------
गुणधर्मामुळे महत्त्व
सफेद कांद्याला औषधी महत्त्व आहे. सर्दी-कफावर ताजा कांद्याचा रस, मध व गूळ उपयुक्त ठरतो. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठीही कांदा लाभदायक आहे. रक्ताची कमतरता, अॅनिमियावरही कांदा परिणामकारक असल्याचे जाणकार सांगतात.
------------------------
काही वर्षांपासून गावात सफेद कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पिकातून दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळते. यंदा उशिराने लागवड झाली असली तरी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.
- अनिल जाधव, सफेद कांदा उत्पादक, म्हसरोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.