मुंबई

मिरा-भाईंदरचे कारभारी नव्या दमाचे

CD

मिरा-भाईंदरचे कारभारी नव्या दमाचे
महापालिकेत ४० हून अधिक नवे चेहेरे दिसणार
भाईंदर, ता.१९ (बातमीदार): मिरा-भाईंदर पालिकेच्या सभागृहात ४० हून अधिक नवे चेहेरे दिसणार आहेत. यापैकी चार ते पाच नगरसेवक २१ ते २५ वयोगटातील असून पालिकेचा कारभार नव्या दमाच्या उमेदवार पाहणार आहेत.
मिरा-भाईंदर पालिकेत भाजपने २० माजी नगरसेवकांना संधी नाकारताना पक्षाच्या धोरणानुसार तीस टक्के युवा चेहऱ्यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने दहा माजी नागरसेवकांऐवजी नवे चेहेरे निवडणूक रिंगणात उतरवले. तर निवडणुकीच्या निकालांनतर २२ माजी नगरसेवकांना मतदारांनी घरी बसवले. त्यामुळे महापालिकेत ४२ नवीन चेहरे दिसणार आहेत. त्यात भाजपचे ३२ आणि काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत. तर २१ ते २५ वयोगटातील ४ ते ५ युवा तसेच उच्च शिक्षित नगरसेवकांचा समावेश आहे.
--------------------------------
सभागृहात महिलांचे वर्चस्व
महिला नगरसेवकांचीही वाढली आहे. ९५ नगरसेवकांपैकी ४८ जागा महिलांसाठी राखीव होत्या. मात्र, प्रत्यक्षात ५१ जागांवर महिला निवडून आल्या आहेत. परिणामी, सभागृहात महिलांचे वर्चस्व असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT