मुंबई

पेण खारेपाट पाणीटंचाईने व्याकुळ

CD

पेण खारेपाट पाणीटंचाईने व्याकुळ
नागरिकांना सात दिवसाआड पाणी; प्रशासनाविरोधात संताप
पेण, ता. १९ (वार्ताहर) : तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथील नागरिकांना सध्या सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पेण येथील शहापाडा धरणातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पेण-वाशी खारेपाट विभाग पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हेटवणे धरण ते शहापाडा वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजनेसाठी ३८ कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेच्या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू झाले असले, तरी अद्याप खारेपाट परिसराला दिलासा मिळालेला नाही. पूर्वी दोन ते तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता थेट सात दिवसांवर गेल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हेटवणे धरणाच्या कालव्याचे पाईपलाईनद्वारे काम सुरू असल्याने पाण्याचे स्त्रोत कमी झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांनी १२ जानेवारी रोजी सर्व संबंधित ग्रामपंचायतींना पाठवलेल्या अधिकृत पत्रात शहापाडा प्रादेशिक धरणातील पाणीसाठा अल्प असल्याने सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. मार्चअखेरपर्यंत पुरणारा पाणीसाठा जानेवारीतच संपत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
...............
या पार्श्वभूमीवर खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दररोज किंवा किमान नियमित पाणीपुरवठा सुरू करावा. अन्यथा वाशी-शिर्की खारेपाटातील विविध संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी सेफाली देशमुख यांनी सांगितले की, हेटवणे धरणातून येणाऱ्या पाईपलाईनला सध्या पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणीटंचाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच वर्क ऑर्डर निघेल आणि दहा दिवसांत काम पूर्ण करून खारेपाट परिसरात किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT