मुंबई

राजकोटजवळ पाण्याचे रिंगण

CD

राजकोटजवळ पाण्याचे रिंगण
समुद्रातील बदलांमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
विरार, ता. १९ (बातमीदार)ः वसईपासून ६६ नॉटिकल अंतरावर राजकोटच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाले आहे. या घटनेला आठ दिवसांचा अवधी झाला असला तरी कोणतेही कारण समोर आले नसल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वसईतील पाचुबंदरच्या कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची ओम नमः शिवाय मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. त्याचवेळी राजकोट जवळ पाण्यामध्ये मोठे गोलाकार वर्तुळ तयार झाले होते. या वर्तुळात मातकट रंगाचे पाणी वेगाने निघत समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, पण ओएनजीसीचा गॅस किंवा ऑइलच्या वाहिनीला गळतीमुळे अशा स्वरूपाचा पाण्याचा प्रवाह झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे, पण कुठल्याही यंत्रणेने याबाबत शिक्कामोर्तब केले नसल्याने प्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे.
================
ज्या बोटीसोबत ही घटना घडली होती, त्यांनी माहिती दिल्यानंतर तत्काळ तटरक्षक दल व नौदलाला कळविण्यात आले आहे तसेच अन्य शासकीय यंत्रणांना माहिती देण्यात आलेली आहे. हे कशामुळे झालंय याची माहिती अजूनही देण्यात आलेली नाही.
- विनोद लहारे, (मत्स्य परवाना अधिकारी, वसई)
==============
ही घटना वसईजवळील नसून राजकोटजवळील समुद्रातील आहे. खोल समुद्रात आम्हा मच्छीमारांना मच्छीमारीसाठी जाण्यास भीती वाटत आहे.
- सतीश गमजा, मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT