मुंबई

इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सृजनकुंभ २०२६’ शिखर परिषद यशस्वी

CD

‘सृजनकुंभ २०२६’ उत्साहात
इंदाला शैक्षणिक संकुल आणि मराठी विज्ञान परिषदेचा स्तुत्य उपक्रम
कल्याण (बापसई), ता. १९ : मराठी विज्ञान परिषद आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी आणि आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित ‘सृजनकुंभ २०२६’ ही दोन दिवसीय शिखर परिषद शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) बापसईतील इंदाला कॅम्पस येथे यशस्वीरीत्या पार पडली.
परिषदेचे उद्‍घाटन राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. उद्‍घाटनपर भाषणात त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत घडविण्यात युवकांची भूमिका निर्णायक असून, शिक्षण हे संशोधनाभिमुख व समस्याआधारित असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ व मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष दा. कृ. सोमण, एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे आणि एनसीव्हीईटीचे संचालक डॉ. सुहास देशमुख यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
परिषदेत एआय, ड्रोन तंत्रज्ञान, थ्रीडी प्रिंटिंग, आयओटी व रोबोटिक्स या विषयांवरील तज्ज्ञ व्याख्याने, पॅनेल चर्चा, पोस्टर सादरीकरण, हँड्स-ऑन कार्यशाळा आणि स्पार्काथॉन स्पर्धा आयोजित केली. औद्योगिक प्रदर्शनात २० हून अधिक उद्योग, स्टार्टअप्स व विद्यार्थ्यांची नावीन्यपूर्ण मॉडेल्स सादर करण्यात आली. रविवारी उद्योजकता व निधी उभारणी या विषयावर विशेष सेमिनार झाले. स्पार्काथॉनमध्ये ६४ संघांनी सहभाग घेतला असून विजयी संघांना प्रमाणपत्रे व रोख बक्षिसांचे धनादेश प्रदान करण्यात आले. आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक डॉ. नटराजन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. या परिषदेत ठाणे जिल्ह्यातील शाळा तसेच अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी व आयटीआय संस्थांमधील तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिखर परिषदेचे आयोजन इंदाला शैक्षणिक संकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आयोजन समितीने सर्व मान्यवर, उद्योग प्रतिनिधी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

अंतराळातील मोहिमांतील अनुभवांचे कथन
इस्रोच्या यू. आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक डॉ. एस वेंकटेश्वरा शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी चांद्रयान व मंगळयान मोहिमांतील अनुभव मांडत स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद, संघभावना व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारत अंतराळ क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचत असल्याचे स्पष्ट केले. अपयशातून शिकणे हेच यशाचे गमक आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

निवडक प्रकल्पाना अप्रेंटिसशिपची संधी
स्पार्काथॉनमधील निवडक विजयी स्टार्टअप कल्पनांना इंडस्ट्री मेंटॉरशिप, इन्क्युबेशन व प्रकल्प सहकार्य देण्यात येणार असून, काही उद्योगांनी इंटर्नशिप व अप्रेंटिसशिप संधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT