मुंबई

दोन गावठी बनावट पिस्टलसह ४ जिवंत काडतुसे जप्त

CD

शस्त्रविक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन आरोपीला अटक
दोन गावठी पिस्तुलांसह चार काडतुसे जप्त
ठाणे, ता. १९ : उत्तर प्रदेशमधून ठाण्यात अवैधरित्या शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख १४ हजार रुपये किमतीची दोन गावठी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

वागळे इस्टेट येथील साई पान शॉपसमोरील फुटपाथवर एक तरुण शस्त्रविक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी (ता. १८) पहाटे पावणे सहाच्या सुमारास सापळा रचला. या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ही अग्निशस्त्रे मिळून आली. ताब्यात घेतलेला मुलगा हा उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातील रहिवासी आहे. इतक्या लहान वयात त्याच्याकडे ही शस्त्रे कोठून आली आणि तो ती कोणाला विकणार होता, याचा तपास आता पोलिस करत आहेत. दोन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे असा एकूण किंमत दोन लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT