मुंबई

राजकारणातून समाजसेवेचा निर्धार

CD

राजकारणातून समाजसेवेचा निर्धार
नालासोपाऱ्यात २२ वर्षीय प्रदीपिका सिंग नगरसेवक
वसई, ता. १९ (बातमीदार )ः राजकारण नको रे बाबा, असा सूर अनेकदा तरुणांचा असतो. मात्र, नालासोपारा येथील २२ वर्षीय प्रदीपिका सिंग मात्र अपवाद ठरली असून, महापालिका निवडणुकीतून राजकारणात प्रवेश करताना तिने तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
नालासोपारा पूर्व येथील श्रीराम नगर येथे प्रदीपिका सिंग आई-वडील, आजी-आजोबा, दोन भावांसह वास्तव्य करते. तिचे आजोबा २६ वर्षांपासून बहुजन विकास आघाडीत कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामासाठी सदैव तत्पर असलेल्या आजोबांमुळे प्रदीपिकेलाही राजकारणाची गोडी लागली आहे. जनतेची कामे करण्यासाठी ‘बविआ’ पक्षातून तिने प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे, प्रदीपिका बीएचएमएसचे शिक्षण घेत आहे, पण मिळालेली संधी गमवायची नसल्याचा निर्धार करताना तिने राजकीय प्रवास सुरू केला आहे.
------------
पक्षप्रमुखांची शाबासकीची थाप
बहुजन विकास आघाडीतील कमी वयाची उमेदवार असलेली प्रदीपिकाला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिच्यासमोर शिंदे गटाच्या कल्याणी पाटील यांचे कडवे आव्हान होते. तरीदेखील १३ हजार ९०० मते मिळवत चार हजार मतांच्या फरकाने तिने बाजी मारली आहे. तिच्या यशाचे बविआचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनीदेखील कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT