मुंबई

माघी गणेशोत्सवानिमित्त फुलांची मागणी वाढली

CD

माघी गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली
उत्सवकाळात दरवाढ होण्याची शक्यता
ठाणे, ता. १९ (बातमीदार) : माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांमध्ये गणेशाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचा परिणाम थेट बाजारपेठांवर दिसून येत आहे. माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलबाजार फुलले असून, घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सजावटीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे. गणेशाच्या आरास व सजावटीसाठी लागणाऱ्या विविध रंगांच्या आकर्षक फुलांना सध्या विशेष मागणी आहे.
यावर्षी २२ जानेवारीला माघी गणपतीचे आगमन होणार असून, त्यासाठी शहरातील विविध भागांत तयारीला वेग आला आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच घरगुती माघी गणेशोत्सवानिमित्त भाविक सजावटीचे साहित्य, पूजासाहित्य व फुले खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोंडा, अष्टर, शेवंती, ऑर्किड, सनफ्लॉवर, गुलाब अशा फुलांना विशेष मागणी आहे. याशिवाय फुलांचे हार, कंठी, तोरण यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवाच्या काळात फुलांची आवक आणि विक्री दोन्ही वाढते. सध्या बाजारपेठांमध्ये फुलांचे दर तुलनेने स्थिर आहेत. मात्र उत्सव जवळ येताच मागणीत वाढ झाल्याने दरात चढ-उतार होण्याची शक्यता फुलविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. माघी गणेशोत्सवाच्या काळात फुलांची मागणी लक्षणीय वाढते. त्यामुळे येत्या काही दिवसांत फुलांच्या दरात वाढ होऊ शकते, असे फुलविक्रेते अंकित यादव यांनी सांगितले.
.................

सध्याचे बाजारभाव (रु. किलो)*
केसरी गोंडा : ६०
पिवळा गोंडा : ६०
पांढरी शेवंती : २००
पिवळी शेवंती : २५०
अष्टर (जांभळी, पांढरी, गुलाबी) : २००
ऑर्किड : ३००
जिप्सी : २०० रु. प्रति बंडल
गुलाब : १६० ते २४०
वेणी : २० ते २५ रु.
गजरा : १०० रुपयांना ४
अबोली गजरा : १०० रुपयांना ४
चमेली गजरा : १०० रुपयांना ४
गुलाब गजरा : ६० रुपयांना १
चाफा : ५० रु. वाटा
मोठा हार : १५० ते ५००
छोटा हार : ५० ते ३००
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT