मुंबई

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर

CD

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर!
एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महापालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून, मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. दरम्यान, शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते; मात्र या सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महापौर महायुतीचाच होईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे. मुंबईकरांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना-भाजपला मतदान केले असून, त्यांच्या मताशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसेल, अशा आशयाची विधाने केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले होते. शिंदे यांना आपले नगरसेवक फुटण्याची भीती असल्यामुळे त्यांनी आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता.
...
जिथे महायुती तिथे...
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्या ठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT