मुंबई

कल्याण विठ्ठलवाडीला जोडणाऱ्या जुन्या पुलाचे पाडकाम

CD

कल्याण-विठ्ठलवाडीला जोडणाऱ्या जुन्या पुलाचे पाडकाम
नवा पूल तयार होईपर्यंत वाहतुकीत बदल
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : विठ्ठलवाडी पूना लिंक रोड, कोळसेवाडी पोलिस स्थानकाजवळील वालधुनी नदीवरील जुना पूल तोडून नवीन पूल बांधला जाणार आहे. हे काम गुरुवारपासून (ता. २२) सुरू होत असल्याने येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काम पूर्ण होईपर्यंत हे बदल कायम राहतील, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

कल्याण-विठ्ठलवाडीला जोडणारा वालधुनी नदीवरील पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने पूना लिंक रोडवरील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. पावसाळ्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे सदर पूल पाण्याखाली येत असल्याने वाहतूक बंद होते. परिणामी दोन्ही बाजूंचा संपर्क तुटतो. शिवाय पुलाचे संरक्षक कठडेही तुटल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे जुना पूल पाडून नव्या पुलाची निर्मिती केली जाणार आहे. तसेच पुररेषा लक्षात घेत पुलाची उंचीदेखील वाढवली जाणार आहे. याच भागातून उन्नती मार्ग सुरू होत असल्याने महत्त्व वाढणार आहे.

पूना लिंक रोड कल्याण पूर्वेतून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक आणि उल्हासनगर श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गणेश विसर्जन तलाव स्मशानभूमी चौकात प्रवेश बंद केला आहे. अशा वाहनांना स्व. आनंद दिघे उड्डाणपुलावरून सम्राट अशोक चौकमार्गे इच्छित ठिकाणी जावे लागेल. श्रीराम चौक आणि विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाहून चक्कीनाकाकडे येणाऱ्या वाहनांना श्रीराम चौकात प्रवेश बंद आहे. ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर उल्हासनगर, सम्राट चौकमार्गे डावीकडे वळून पुढे जावीत, असे निर्देश आहेत. दरम्यान, पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांना हे बदल लागू होणार नाहीत.

स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग
१) काटेमानिवली स्व. प्रल्हाद शिंदे पुलाखालून हनुमान नगरमार्गे कैलाशनगर खडगोळवली पुलाहून विठ्ठलवाडी उल्हासनगरकडे जाता येईल.
२) उल्हासनगरहून कल्याण पूर्वेत येण्यासाठी श्री राम चौक पेट्रोलपंप येथून आशेळे मार्गाहून पुढे येत, उजवीकडे खडेगोळवली मार्गे, कैलासनगरहून हनुमान नगर रस्त्यातून काटेमानीवली चौकात पोहोचता येईल.

अंतर्गत रस्त्यांवर कोंडीचा प्रश्न
जुना पूल तोडून नव्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पावसाळ्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. मात्र, तोपर्यंत खडेगोळवलीसह हनुमान नगरमधील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. निमुळते रस्ते व अनधिकृत फेरीवाले, हातगाडी ही मोठी समस्या असून, त्यादृष्टीने महापालिकेला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT