मुंबई

एसआयआयएलसी

CD

एसआयआयएलसी

व्यावसायिक बेकरी कार्यशाळा

पुणे, ता. १९ : बेकरी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजक, स्वयंसहाय्यता गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला व नवउद्योजकांसाठी व्यावसायिक बेकरी कार्यशाळेचे २४ व २५ जानेवारीला आयोजन केले आहे. यात बेकरी उद्योगातील उत्पादन तंत्रज्ञान, विविध उत्पादने आणि व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ब्रेड व त्याचे विविध प्रकार, बिस्किटे, नानकटाई, कराची बिस्कीट, नावीन्यपूर्ण कुकीज, टोस्ट, खारी, बटर आयटम्स, कप केक, केकचे विविध प्रकार, डोनट्स, बन्स, लादी पाव तसेच इतर बेकरी उत्पादने प्रत्यक्ष पद्धतीने शिकवली जाणार आहेत. याशिवाय बेकरीसाठी मशिनरी, कॉस्टिंग, पॅकिंग व लेबलिंगचे महत्त्व, कच्चामाल व्यवस्थापन तसेच बेकरी स्टार्टअप सुरू करण्याची प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. अन्नसुरक्षा परवाने, लायसन्सिंग आणि कायदेशीर बाबींची माहितीही देण्यात येईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२

महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण

प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करीत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच २ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५

बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण

आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशावेळी बीपीएमएस पोर्टल व प्री-डीसीआर प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. २ फेब्रुवारीपासून सुरू होणारे बीपीएमएस पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात यूडीसीपीआर नियोजन नियम, बिल्डिंग परमिशन प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि प्री-डीसीआर टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हॉट्सॲप सहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७१

शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण

विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे १० दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटली सही, ईएमडी व एसडीमध्ये सवलत कशी मिळवायची, भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३०७३९१७१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT