मुंबई

मुंबई महापालिकेत ११७ नवे चेहरे

CD

मुंबई महापालिकेत ११७ नवे चेहरे  
अनुभवी नगरसेवकांवर राजकीय पक्षांची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या वेळी ११७ नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. २०१७ आणि त्याआधीच्या कार्यकाळाचा अनुभव असलेले १०० माजी नगरसेवक या वेळी पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष या नगरसेवकांवर जबाबदारी सोपविणार आहेत. महापालिकेत निम्म्यापेक्षा अधिक नवे चेहरे दिसणार आहेत.
माजी नगरसेवक आपल्या अनुभवाच्या जोरावर जुने नगरसेवक आपले वर्चस्व टिकवतात की अभ्यास, वक्तृत्व आणि सक्रियतेच्या जोरावर नवे चेहरे आघाडी घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालानंतर आता सर्व नगरसेवकांना महापालिका सभागृहात बसण्याची उत्सुकता लागली आहे. महापौर निवडीपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू होणार नसले, तरी प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या सभागृहात मांडून विकासात्मक भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
...
लक्षवेधी नवे चेहरे
१. भाजपकडून ८९ नगरसेवक निवडून आले असून, त्यात तेजिंदर तिवाना, नवनाथ बन, योगिता पाटील, सीमा शिंदे, निशा परुळेकर बंगेरा, मनीषा यादव, सायली कुलकर्णी, रूपेश सावरकर, डॉ. हेतल गाला मोरवेकर, दिशा यादव, मिलिंद शिंदे, दीपिका घाग, रोहिदास लोखंडे, अजय पाटील, संतोष ढाले, गौरवी नार्वेकर-शिवलकर यांचा समावेश आहे.
२. शिवसेना ठाकरे गटातून ६५ नगरसेवक निवडून आले असून अंकित प्रभू, सारिका झोरे, लक्ष्मी भाटिया, सना खान, गितेश राऊत, लोना रावत, हरी शास्त्री, राजुल संजय पाटील, डॉ. सरिता म्हस्के, अनिल कदम, विजय भगणे, श्रद्धा पेडणेकर, किरण तावडे, संपदा मयेकर हे नवे चेहरे लक्षवेधी ठरले आहेत.
३. शिवसेना (शिंदे गट) पक्षातून दीक्षा हर्षल कारकर यांच्यासह रितेश राय, निर्मिती कानडे, अपेक्षा खांडेकर यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून हैदर अस्लम अली, अमिर नसीम खान, डॉ. समन आझमी, राजेश्री भाटणकर, रुक्साना पारकर, तर मनसेकडून यशवंत किल्लेदार, सई शिर्के, विद्या आर्य हे नवे नगरसेवक निवडून आले आहेत.
...
मोठे आव्हान
महापालिकेच्या आगामी कार्यकाळात नव्या नगरसेवकांची कामगिरी, प्रश्न मांडण्याची शैली आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यावर संपूर्ण मुंबईचे लक्ष असणार आहे. सभागृहातील कामकाज पद्धती, वैधानिक समित्यांची भूमिका, विकासकामांचे नियोजन आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे हे मोठे आव्हान नव्या नगरसेवकांमोर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT