मुंबई

माकपचे ‘लाल वादळ’ मार्गस्थ

CD

माकपचे ‘लाल वादळ’ धडकणार
५० हजारांचा लाँग मार्च पालघरकडे मार्गस्थ
कासा, ता. १९ (बातमीदार) : जल, जंगल, जमीन आणि रोजगारासह विविध मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात चारोटी ते पालघर असा ३० किलोमीटरचा लाँग मार्च सोमवारी निघाला. जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, कामगारांसह जवळपास ५० हजार नागरिकांचे ‘लाल वादळ’ मजल दरमजल करीत मंगळवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथून दुपारी दोन वाजता हा महामोर्चा मार्गस्थ झाला. रात्री मनोर येथील मुक्कामानंतर मंगळवारी (ता. २०) ‘लाल वादळ’ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. सरकारने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात मागण्या मान्य करेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय एक पाऊलही मागे हटणार नाही, असा निर्धार आमदार विनोद निकोले यांनी व्यक्त केला. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच अशा संघटनांसह जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, कामगारांसह हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत.
माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, डहाणूचे आमदार विनोद निकोले, एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हेदेखील मंगळवारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
---
प्रमुख मागण्या
- वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करा.
- देवस्थान, इनाम, वरकस व सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करा.
- रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करा.
- स्मार्ट मीटर योजना रद्द करा.
- पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा.
- चार श्रम संहिता रद्द करा.
- वाढवण व मुरबे बंदरासह जनविरोधी प्रकल्प रद्द करा.
- शिक्षण, रोजगार, रेशन व आरोग्य सुविधा वाढवा.
---------
अनेक प्रकल्प येऊनही बेरोजगारी, वनपट्टे, रेशन, मनरेगा, जलजीवनसारख्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. चौथी मुंबई, विमानतळाची स्वप्ने दाखवली जातात; पण एसटी वेळेवर नाही, शेतीला पाणी नाही, वीजबिले वाढलेली आहेत. वाढवण बंदरामुळे मच्छीमार देशोधडीला लागतील.
- अशोक ढवळे, राष्ट्रीय नेते
----
पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही रेशन कार्ड, वनपट्टे, वीजबिले, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. वाढवण बंदर, मोरबे बंदर, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांमुळे पर्यावरण, जनजीवनाची हानी होत आहे. या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला आहे.
- विनोद निकोले, आमदार
----
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, योजना बंद पडल्या आहेत. विकासाच्या नावाखाली फक्त घोषणा केल्या जात आहेत. आजचे हे लाल वादळ सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवेल.
- अजित नवले, शेतकरी नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT