मुंबई

दुबई खान्देश महोत्सव उत्साहात संपन्न

CD

दुबईत खान्देश महोत्सव उत्साहात
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : ‘खान्देशी इन युएई’ या सामाजिक व सांस्कृतिक समूहाच्या वतीने खान्देश महोत्सव नुकताच दुबईतील अजमान येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे २०० पेक्षा अधिक खान्देशी बंधू-भगिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी मुलांसाठी खास ‘तीन पावली’ खान्देशी नृत्य कार्यशाळा हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. यासोबतच प्रौढ व मुलांसाठी वेगवेगळे गट-खेळ घेण्यात आले.
खान्देश महोत्सवाला दुबई येथील प्रसिद्ध उद्योगपती धीरज जैन यांनी आपल्या आई-वडिलांसोबत विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्याची दखल घेत त्यांचा ‘खान्देश आयकॉन’ म्हणून सत्कार करण्यात आला. शेव-भाजी, भाकरी, वांग्याचे भरीत, कढी-खिचडी अशा पारंपरिक पदार्थांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अहिराणी गाण्यांच्या तालावर सर्वांनी एकत्र ठेका धरत आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भूषण चौधरी, घनश्याम पाटील, महेश जायखेडकर, राहुल पाटील, गणेश बोरसे, चंद्रशेखर जाधव व पिनल चौधरी यांनी पुढाकार घेतला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलेश जगताप, सारिका जायखेडकर, स्मिता पाटील, अजय पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT