मुंबई

डॉ. प्रमोद नांदगावकर ‘सारथी पुरस्कार २०२५’ने सन्मानित

CD

डॉ. प्रमोद नांदगावकर ‘सारथी पुरस्कार २०२५’ने सन्मानित
टिटवाळा, ता. २० (वार्ताहर) : टिटवाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद नांदगावकर यांना रेड स्वस्तिक सोसायटीचा प्रतिष्ठित ‘सारथी पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. त्यामध्ये संस्थेचा सर्वोच्च मानला जाणारा ‘सारथी पुरस्कार’ हा निरपेक्ष व निस्वार्थ सेवेसाठी दिला जातो. यंदा हा पुरस्कार डॉ. प्रमोद नांदगावकर यांना देण्यात आला आहे. या सोहळ्यात माजी पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर व वेट लिफ्टर स्नेहा कोकणे पाटील, संस्थेचे अध्यक्ष सुरेश कोते आणि डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रेड स्वस्तिक सोसायटीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
डॉ. प्रमोद नांदगावकर यांनी मुंबई, ठाणे, टिटवाळा, कल्याण व परिसरात विशेषतः तळागाळातील, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. त्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा स्वच्छता दूत सन्मानही मिळाला आहे. सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट प्राप्त झाली असून आजवर २५ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT