मुंबई

पद्मदुर्ग किल्ल्यात शौर्यगाथा संमेलन

CD

पद्मदुर्ग किल्ल्यात शौर्यगाथा संमेलन
शेकडो शिवभक्तांची उपस्थिती
मुरूड, ता. २० (बातमीदार) : पद्मदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने शिवप्रेमी मंचतर्फे पद्मदुर्ग शौर्यगाथा ऐतिहासिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मुरूड किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या सागरी किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात इतिहास अभ्यासक आप्पासाहेब परब, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, लायजी सरपाटील यांचे वंशज नीलेश सरपाटील, सुधीर थोरात, प्रवेश पालशेतकर आदी मान्यवर सहभागी झाले. देवी कोटेश्वरीच्या पूजेसह कार्यक्रमाची सुरुवात झाली. भगवा झेंडा व फुलांनी किल्ला सजवल्याने पद्मदुर्ग भगवामय झाला होता.
शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चित्रकार महेंद्र पाटील यांनी पाण्यात साकारलेली शिवरांगोळी आकर्षण ठरली. सुजाण ट्रेकर व सुरक्षित भटकंतीवर मार्गदर्शन तसेच दुर्गसंवर्धनात योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अखेर महाराष्ट्र गीताने सांगता झाली.

रोजगारनिर्मितीची शक्यता
इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी पद्मदुर्गाच्या ऐतिहासिक वास्तूंची अप्रकाशित माहिती विद्यार्थ्यांना सांगत या किल्ल्याच्या अभ्यासातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीची शक्यता अधोरेखित केली. पद्मदुर्गाचे महत्त्व पर्यटक व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे, यासाठी मार्गदर्शक प्रशिक्षण शिबिर आयोजित करून दुर्गाभोवती पर्यटन क्षेत्र वाढवण्याची संधी निर्माण होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT