मुंबई

आवक घटल्याने लसूण तडतडला

CD

जुईनगर, ता. २० (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्याने लसणाचा पुन्हा भडका उडाला आहे. त्यामुळे वाढलेल्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. गेल्या वर्षभरापासून लसणाचे भाव ग्राहकांच्या आवाक्यात होते, मात्र आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने भाव पुन्हा वाढीस लागले आहेत. सध्या कांदा-बटाटा घाऊक बाजारात १७५ ते २०० रुपये, तर किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो भावाने लसूण विक्री होत आहे.

महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात लसूण मुंबई बाजारात येतो, मात्र योग्य प्रतीचा लसूण बाजारात तुलनेने खूपच कमी येत असल्याने ही भाववाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. कांदा-बटाटा बाजारात जवळपास १७५ ते २०० गाड्यांची आवक होत असून, दोन ते तीन गाड्यांमधून जवळपास ३०० गोणी लसूण बाजारात येतो. जास्तीत जास्त सरासरी १०० ते १५० रुपये प्रतिकिलो मिळणारा लसूण गेल्या काही दिवसांपासून २०० ते ४०० रुपयांपर्यंत महाग होऊ लागल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडत आहे. सध्या बाजारात लसणाची आवक कमी असली तरी पुढील महिन्यापासून नवीन लसूण बाजारात येऊन भाव आवाक्यात राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

दुप्पट भाव मोजणीची वेळ
गेल्या काही दिवसांत बाजारात लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेक ठिकाणी ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत दुप्पट भाव मोजावे लागत आहेत. भाववाढीमुळे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे. विशेषतः उपाहारगृह, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही वाढीव खर्चाचा सामना करावा लागत असल्याने काही ठिकाणी पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT