मुंबई

विकासाच्या मुद्द्याला जनमत

CD

विकासाच्या मुद्द्याला जनमत
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची माहिती
भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला महापालिकेत बहुमत दिले आहे. त्यामुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते अशा समस्यांना प्राथमिकता असल्याचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपला घवघवीत यश मिळल्यानंतर मेहता यांनी प्रथमच संवाद साधला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत उपस्थित होते. काही जणांनी ही निवडणूक वैयक्तिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने पक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. त्याला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.
---------------------------
सरनाईक यांना प्रत्युत्तर
भाजपला हिंदू-मुस्लिम वादाचा निवडणुकीत फायदा झाल्याचे मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मेहता यांनी भाईंदरची जनता शांतताप्रिय असून, जातीय अथवा धार्मिक वाद या ठिकाणी नाही. मतदारांनी केवळ भाजपच्या विकासाच्या मुद्द्याकडे पाहून मतदान केले आहे. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे शहराचा विकास कसा होईल, याकडे प्राधान्य असल्याचे मत मेहता यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT