मुंबई

मुंब्र्यात ग्राउंडवर खेळताना वादातून तरुणावर अमानुष हल्ला

CD

खेळाच्या वादातून तरुणावर हल्ला
मुंब्र्यात त्रिकुटाची बॅटने मारहाण ः गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : मुंब्रा येथील एमएम व्हॅली परिसरातील ग्राउंडवर खेळताना झालेल्या वादातून काही मोठ्या मुलांनी एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर त्या मुलाच्या भावाने जाब विचारला असता, एका त्रिकुटाने त्याच्यावरही प्राणघातक हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सैफ, रेहान व जैद या त्रिकुटाविरोधारात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंब्रा-कौसा येथील सईद सुलेमान शेख (२७) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सईद यांचा लहान भाऊ अब्दुल गफार हा एमएम व्हॅली येथील ग्राउंडवर खेळण्यासाठी गेला होता. घरी परत आल्यानंतर त्याच्या मानेवर नखांचे ओरखडे व रक्त दिसून आले. चौकशी केली असता, फुटबॉल खेळत असताना काही मोठ्या मुलांनी त्याच्या मित्राला मारहाण करत होते. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या अब्दुल गफारलाही मारहाण करण्यात आल्याचे त्याने सांगितले.
यानंतर सईद अब्दुल यांच्यासोबत ग्राउंडवर गेले असता सैफ, रेहान व जैद या तिघांना जाब विचारताच त्या त्रिकुटाने सईद यांना बॅटने मारहाण केली आहे. त्याचवेळी तक्रारदाराची आई घटनास्थळी आली असता, त्यांनी तिलाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर जखमी सईद यांना कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्या त्रिकुटाविरोधारात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

Pune Cycle Race: पुण्यातल्या सायकल स्पर्धेबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; स्पर्धकांच्या दिमतीला दोन विशेष पथके

Pune Water Crisis : पुण्यातील पाणीपुरवठा संकट; दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका, महापालिकेची तातडीची उपाययोजना

Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

SCROLL FOR NEXT