मुंबई

सुरजमल मोदी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र

CD

तंत्र प्रदर्शनाचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण

बोर्डी, ता. २० (बातमीदार) : आचार्य भिसे शिक्षण संस्था संचलित राम अवतार सुरजमल मोदी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मंगळवार, २० जानेवारी रोजी तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरणदेखील करण्यात आले.
या प्रदर्शनाला भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष विजय म्हात्रे, कार्यवाह भूपेंद्र भावे, संदीप ठाकूर, अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक उपकरणाची माहिती घेतली. या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी, तसेच वीज व सौरशक्तीवर चालणारी विविध उपकरणे ठेवण्यात आली होती. आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण सुरू असून, त्याचा या भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. यातून येथील अनेकांना रोजगारही मिळाला आहे. येणाऱ्या काळात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करावी व गरजेनुसार उपकरणे तयार करावी असा सल्ला या वेळी संदीप ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सागर पाटील, अमोल दमणकर, चेतन राऊत यांनी विशेष लक्ष दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT