मुंबई

पुलावर बेघरांचे बस्तान

CD

पुलावर बेघरांचे बस्तान
माहीममध्ये पादचारी त्रस्त

धारावी, ता. २० (बातमीदार) : धारावीतून माहीम जंक्शन रेल्वे स्थानक व माहीम पश्चिमेला जाण्यासाठी १० वर्षांपूर्वी स्कायवॉक बांधण्यात आला. हा स्कायवॉक माहीम स्थानकाला व माहीम पश्चिमेच्या सेनापती बापट रस्त्याला जोडण्यासाठी जवळपास पाच वर्षांहून अधिकचा काळ लागला. माहीम पश्चिमेला जाण्यासाठी स्कायवॉकला जोडणारा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. सध्या या पादचारी पुलाचा ताबा काही लोकांनी घेतला असून, त्यावर रात्रंदिवस त्यांचा राबता असतो. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
माहीम जंक्शन स्थानकाच्या पूर्वेला धारावी वसाहत आहे. धारावीतून माहीम पश्चिमेला जाण्यासाठी पूर्वी रेल्वे फाटक होते. हे फाटक ओलांडून गेले की, माहीम पश्चिमेचा भाग सुरू व्हायचा. मात्र, हे फाटक रेल्वे प्रशासनाने बंद केले आहे. या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात आला. या पुलावरून धारावीतील नागरिकांना माहीम पश्चिमेला सहज जाता येते. कालांतराने स्कायवॉक उभारला गेला. हा स्कायवॉक अर्धवट असल्याने लोकांना स्कायवॉकवरून उतरून पुन्हा पादचारी पुलावर चढून जावे लागत होते. या कसरतीमुळे स्कायवॉकवरून न जाता स्कायवॉकखालील रस्त्याचा पादचारी वापर करत होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते.
याची दखल घेऊन स्कायवॉकला जोडणारा पादचारी पूल उभारला आहे. पावसाळ्यानंतर पदपथावर राहणाऱ्या लोकांनी या पुलावर ठाण मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पुलावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.


पूल मोकळा करण्याची मागणी

पुलामुळे धारावीतून सेंट मायकल चर्च, माहीम दर्गा, माहीम चौपाटी, के. जे. खिलनानी शाळा, पालिका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, भाविकांची व पादचाऱ्यांची सोय झाली आहे. मात्र, या बेघरांनी बस्तान मांडल्यामुळे विद्यार्थी, भाविक व पादचारी यांना त्रास होत आहे. पालिका प्रशासनाने या लोकांना पुलावरून हटवावे आणि पूल मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

फोटो - 974

माहीम : पादचारी पुलावर ठाण मांडून बसलेले लोक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT