मुंबई

दुर्गंधीत सापडलेली कचरा पेटी अखेर स्वच्छ

CD

दुर्गंधीत सापडलेली कचरापेटी अखेर स्वच्छ
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील जगदुशा नगर परिसरात भूमिगत कचरापेटीच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे व साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत आज सकाळच्या मुंबई टुडे पुरवणीत “पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा, कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत एन वॉर्ड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
या वृत्ताची दखल एन वॉर्डचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी घेतली. त्यानंतर एन विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता साजिद सौदागर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी भूमिगत कचरापेटीची सखोल स्वच्छता केली. तसेच साचलेला कचरा पूर्णपणे उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.
याचबरोबर नॉर्थ मुंबई शाळेजवळील गोळीबार रोड परिसरात गटारातून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचून राहिला होता. त्यामुळे या मार्गावरही तीव्र दुर्गंधी पसरून नागरिक त्रस्त झाले होते. अखेर या समस्येचीही दखल घेत एन विभागाच्या पालिका अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी साफसफाई करून साचलेला कचरा हटवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT