मुंबई

शहरातील अतिक्रमणांना लगाम

CD

शहरातील अतिक्रमणांना लगाम
अतिक्रमण विभागाकडून कारवाईला वेग; वर्षभरात १ कोटी २४ लाखांहून अधिक दंड वसुल
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : शहरातील बेकायदा अतिक्रमणांविरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने गेल्या वर्षभरात कडक भूमिका घेऊन सातत्यपूर्ण कारवाई राबवली. या कारवाईतून तब्बल १ कोटी २४ लाख ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक जागा, मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, विनापरवाना होर्डिंग-बॅनर तसेच मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण यांच्यावर बुलडोझर चालवत महापालिकेने शहर शिस्तीचा कडक संदेश दिला आहे. या कारवाईमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पोलिस बंदोबस्तात राबवलेल्या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी दुकाने, शेड, टपऱ्या, भिंती पाडण्यात आल्या. कारवाईपूर्वी नोटिसा बजावूनही नियमभंग सुरूच राहिल्याने कठोर पावले उचलावी लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईचा वरचा क्रमांक अबाधित राखण्यासाठी अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे मोठा अडथळा ठरत असल्याने अशा प्रकारांना पाठीशी न घालण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने विभागनिहाय कारवाईला वेग दिला आहे. अकरा महिन्यांत १, ६९, ६७० फेरीवाले हटविण्यात आले असून, कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू होऊ नये यासाठी नियमित मोहिमा अगदी रविवारीही सुरू ठेवण्यात येत आहेत.
....................
यासोबतच १, ४७१ नवीन बांधकामांना नोटिसा, मार्जिनल स्पेस वापरणाऱ्या ३, ३७५ व्यावसायिकांवर कारवाई, २, ५४९ अनधिकृत बांधकामे/झोपड्यांवर धडक, तसेच ९७३ बेकायदा वाहने उचलण्यात आली आहेत. १२, ०८२ होर्डिंग हटवून १३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विभागनिहाय दंड वसुलीमध्ये ऐरोली विभाग आघाडीवर असून येथे २८ लाख ३८ हजार ३०० रुपये दंड वसूल झाला आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व दिघा विभागांतही व्यापक कारवाया झाल्या आहेत. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे अनेक ठिकाणी पदपथ मोकळे झाले असून शहराच्या सौंदर्य, सुरक्षितता आणि वाहतुकीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे.
.................

चौकट :
विभागनिहाय दंड वसुल (रु.)
बेलापूर – ११, ५४, ७०० |
नेरुळ – १८,१६,००० | वाशी – २३,७५,२०० | तुर्भे – १६,०१,००० | कोपरखैरणे – १५,६७,४०० | घणसोली – ९,३४,२०० | ऐरोली – २८,३८,३०० | दिघा – १,४९,०००
....................
उच्च न्यायालयाचे निर्देश तथा आयुक्तांच्या सूचना यानुसार नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामावर सतत कारवाई करण्यात येत आहे सद्यस्थितीत बहुमजली इमारतींचे सुरू असलेले ७४ बांधकामे आमच्या रडारवर आहेत. या ७४ पैकी १९ बांधकाम निष्कषित करण्यात आलेली आहेत. उर्वरित बांधकामे यथावकाश आणि प्रत्येक विभागनिहाय आम्ही निष्कासित करणार आहोत.
डॉ. कैलास गायकवाड, अतिक्रमण उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Tax New Rules : आता 'या' वाहनांना 'फिटनेस सर्टिफिकेट' अन् 'एनओसी'ही मिळणार नाही!

Pune Cycle Race: पुण्यातल्या सायकल स्पर्धेबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; स्पर्धकांच्या दिमतीला दोन विशेष पथके

Pune Water Crisis : पुण्यातील पाणीपुरवठा संकट; दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका, महापालिकेची तातडीची उपाययोजना

Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

SCROLL FOR NEXT