मुंबई

पनवेलमध्ये स्वीकृत नगरसेवक सातवर

CD

पनवेलमध्ये स्वीकृत नगरसेवक सातवर
दोन जागा वाढल्याने राजकीय स्पर्धा तापली
पनवेल, ता. २० (बातमीदार) : राज्य शासनाच्या नव्या निर्देशांनुसार पनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या दोनने वाढणार असून, आता ही संख्या सातवर स्थिरावणार आहे. याअगोदर ही संख्या पाच होती. नव्या निर्णयामुळे उपलब्ध झालेल्या दोन अतिरिक्त जागांमुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटात तुफान स्पर्धा पेटली असून, स्वीकृत नगरसेवक पदाच्या राजकीय महत्त्वाची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.
महापालिकेच्या एकूण संख्याबळाच्या १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० सदस्य स्वीकृत करता येतील, असा शासनाचा नियम आहे. पनवेल महापालिकेत निवडून आलेले ७८ सदस्य असल्याने तांत्रिकदृष्ट्या १० सदस्यांची तरतूद लागू होत नाही. परिणामी आता सात सदस्यांची नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. संख्याबळानुसार सत्ताधाऱ्यांना पाच तर विरोधकांना दोन सदस्यांची संधी मिळणार आहे.
निवडणुकीपूर्वी व निकालानंतर अनेक इच्छुकांना स्वीकृत पदाचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा असून या चर्चेने आता वेगळेच गांभीर्य घेतले आहे. स्वीकृत नगरसेवक पद हे राजकीय पुनर्वसनाचे प्रभावी माध्यम मानले जाते. त्यामुळे निवडणुकीत संधी न मिळालेल्या, संघटनाबांधणीमध्ये पुढे असलेल्या, तसेच आर्थिक व सामाजिक प्रभाव असलेल्या अनेकांची नावे चर्चेत आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेकाप व काँग्रेस यांच्या गटातही दोन जागांवर दावा करण्यासाठी काटेरी राजकारण सुरू झाल्याचे बोलले जात आहे. तर सत्ताधारी गटाकडे तितकाच दबाव असून आघाडीतील उमेदवारांची निवड करताना जातीय-सामाजिक गणित, पक्षनिष्ठा, स्थानीक प्रभाव आणि निवडणूक-पूर्व आश्वासने या अनेक समीकरणांचा विचार करावा लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील आठवडाभरात अधिकृत यादी निश्चित होण्याची शक्यता असून तिच्याकडे पनवेलच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पूरक राजकारण, समतोल साधायची कसरत आणि अंतर्गत नाराजी व्यवस्थापित करण्याची जबाबदारी आता नेत्यांवर आहे.

चौकट : आश्वासनांची परीक्षा
निवडणूक काळात स्वीकृत पदासंदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे. मात्र जागा कमी आणि इच्छुक अधिक असल्याने अपेक्षाभंग व नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना सामाजिक-जातीय समतोल, पक्षनिष्ठा व स्थानिक प्रभाव या घटकांना महत्त्व द्यावे लागणार आहे.

चौकट : सर्वांचे लक्ष अंतिम यादीकडे
सत्ताधारी व विरोधकांकडून लवकरच स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत नावे जाहीर होतील. कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाचा तुरा वर राहतो यावरून महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Sangli ZP : “चार तालुके सुरक्षित, सहा तालुक्यांत काँग्रेसची कसोटी!” सांगली राजकारणात अस्तित्वाची लढाई

KDMCमध्ये राजकीय उलथापालथ! सत्तेसाठी शिंदेंची खेळी, मनसेच्या पाठिंब्यानं समीकरणच बदललं; भाजपसह उद्धव ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT