मुंबई

आंदोलनाला परवानगी द्या, धनगर समाज उच्च न्यायालयात  धाव

CD

आंदोलनाला परवानगीसाठी धनगर समाज न्यायालयात
मराठा आंदोलनाची आठवण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी मागणाऱ्या धनगर समाजाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. आझाद मैदानात काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाची आठवण करून देताना न्यायालयाने मराठा आंदोलकांवर टीका केली.
या आंदोलकांनी एक दिवसाचे आंदोलन करू सांगून पाच दिवस आझाद मैदान आणि परिसर व्यापून टाकला होता. आंदोलन स्थळ आणि मुंबई सोडण्यापूर्वी सर्व रस्ते स्वच्छ करण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलकांनी रस्ते अस्वच्छ ठेवूनच मुंबई सोडल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिका कर्मचाऱ्यांना घाण उचलून रस्ते स्वच्छ करावे लागल्याची आठवण न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने केली. आझाद मैदान येथे २१ जानेवारीला आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलिस दीपक बोऱ्हाडे यांनी याचिका केली असून, तातडीची सुनावणी घेण्याची मागणीही केली. धनगर समाजाच्या प्रतिष्ठेच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्याचे असल्याचेही बोऱ्हाडे न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठा आंदोलनावर भाष्य करीत तुम्हीही आंदोलन करण्यासाठी मोकळे आहात, परंतु विशिष्ट दिवशीच आंदोलनाची मागणी कोणी करू शकत नाही. धनगर समाजाच्या याचिकेवर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
...
प्रकरण काय?
आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी याचिकाकर्त्यांनी यापूर्वी पोलिसांकडे अर्ज केला होता. पोलिसांनी तो फेटाळला. धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करीत आहे. त्याकरिता सरकारी ठराव काढण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची परवानगी मागण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Sangli ZP : “चार तालुके सुरक्षित, सहा तालुक्यांत काँग्रेसची कसोटी!” सांगली राजकारणात अस्तित्वाची लढाई

KDMCमध्ये राजकीय उलथापालथ! सत्तेसाठी शिंदेंची खेळी, मनसेच्या पाठिंब्यानं समीकरणच बदललं; भाजपसह उद्धव ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT