मुंबई

ठाण्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

CD

ठाण्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे, ता. २१ : अभ्यास करण्यावरून आईने हटकल्यामुळे रागाच्या भरात एका आठवीत शिकणाऱ्या मुलीने घर सोडल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात घडली आहे. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने, तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला असून कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (ता. १९) सकाळी आई-वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना अभ्यासात लक्ष देत नसल्याबद्दल समज दिली होती. मुलीचे वडील कामाच्या निमित्ताने केरळला गेले होते, संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुलगी नेहमीप्रमाणे सोसायटीच्या आवारात खेळायला जात होती. त्या वेळी आईने तिला पुन्हा अभ्यासाची आठवण करून दिली, ज्यामुळे ती मुलगी रागातच बाहेर पडली. रात्री १० वाजता मुलीचा भाऊ तिला बोलावण्यासाठी खाली गेला, तेव्हा ती सायकल चालवत होती आणि तिने घरी येण्यास नकार दिला. त्यानंतर रात्री १०.३० वाजता आई आणि भाऊ पुन्हा तिला आणण्यासाठी खाली गेले असता ती गायब होती. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने ती सायकलसह गेटबाहेर गेल्याचे सांगितले. नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली. अनोळखी व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत नमूद केला आहे. कासारवडवली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT