मुंबई

उमेश कोल्हेंची हत्या भीती पसरविण्यासाठीच

CD

उमेश कोल्हेंची हत्या भीती पसरविण्यासाठीच

आरोपीचा जामीन फेटाळताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : अमरावती  येथील व्यावसायिक  उमेश कोल्हेंची हत्या ही सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती, असे निरीक्षण मंगळवारी (ता. २०) उच्च न्यायालयाने नोंदवले आणि आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

‘अशा प्रकारचे गुन्हे समाजावर आघात करणारे ठरतात. त्याचा परिणाम सदसद्विवेकबुद्धीवर होतो, समाज असुरक्षित होतो आणि सतत भीतीच्या छायेखाली जगण्यास प्रवृत्त होतो,’ असे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ४६ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर युसूफ खानचा जामीन अर्ज फेटाळून लावताना नोंदवले. तसेच अर्जदाराचा कथित गुन्हात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे पुरावे आहेत, आरोपींनी एक दहशतवादी टोळी तयार केली होती, ज्याचा उद्देश मृत व्यक्तीने केलेल्या त्यांच्या धर्माच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी व त्याची निर्घृण हत्या करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण करणे हा होता, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. निःसंशयपणे, कथित गुन्हा गंभीर आणि घृणास्पद स्वरूपाचा आहे. त्यामुळे अर्जदार जामीन मिळण्यास पात्र नसल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले.

११ जणांना अटक
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक  उमेश कोल्हे  यांची हत्या करण्यात आली होती. अमित मेडिकलचे संचालक  उमेश कोल्हे  हे दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर ११ जणांना अटक केली होती. त्यापैकी काही आरोपी अद्यापही फरार  आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT