मुंबई

ध्यानामुळे आत्मविश्वासाला बळ

CD

ध्यानामुळे आत्मविश्वासाला बळ
उल्हासनगरमध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचे सत्संग
मुंबई, ता. २० : भक्ती, संगीत, सांस्कृतिक अभिमान दर्शविणाऱ्या आणि नेत्रदीपक सादरीकरणाच्या रंगात रंगलेल्या मंगळवारी (ता. २०) रम्य सायंकाळी जागतिक आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत उल्हास उत्सव महासत्संग आयोजित करण्यात आला होता.

ध्यानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकत श्री श्री रविशंकर यांनी सांगितले, की ‘ध्यान हीच खरी गोष्ट आहे. ज्याप्रमाणे भाजीला फोडणी दिली जाते, कोणीही नुसती फोडणी खाऊ शकत नाही; ती भाजीसोबतच चांगली लागते. त्याचप्रमाणे, जीवनातील इतर सर्व काही केवळ फोडणीसारखे आहे. खरे सार प्रेम आणि विश्वास आहे. ध्यान आत्मविश्वासाला बळ देते आणि आत्मविश्वास जीवनावरील विश्वासाला बळ देतो. जेव्हा योग मनाला शुद्ध करतो, तेव्हा प्रेम जागृत होते आणि जेव्हा प्रेम जागृत होते, तेव्हा योग सहजपणे घडतो. जीवनात तीन प्रकारच्या श्रद्धेची आवश्यकता असते. स्वतःवर श्रद्धा, समाजात चांगली माणसे आहेत यावर श्रद्धा आणि देवावर श्रद्धा.’ या कार्यक्रमाला जवळपास ५० हजार भाविकांची उपस्थिती होती. या वेळी १,००८ नर्तकांद्वारे ‘नृत्य सेवा’ सादर करण्यात आले. सोबत कलाकारांनी शिव आनंद तांडव सादर केले, हे शिवाच्या आनंदमय नृत्याचे चित्रण करणाऱ्या तांडवाच्या प्रकारांपैकी एक आहे. श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेच्या मुलांनी केलेल्या श्लोक पठणाने उपस्थितांची मने जिंकली.

मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची गरज!
उल्हास उत्सव महासत्संग कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, अंबरनाथ नगरपालिकेच्या अध्यक्षा तेजश्री अभिजित करंजुले, अंबरनाथ भाजपचे अध्यक्ष गुलाबराव करंजुले, सहआयुक्त वंदना गुलवे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे उपस्‍थित होते. दरम्‍यान, रविवारी (ता. १८) गुरू श्री श्री रविशंकर टाटा मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर त्यांनी शहरातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित केले. या वेळी त्यांनी या लोकांनी आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देण्याची आणि प्राणायाम व ध्यानधारणेवर आधारित विज्ञान-समर्थित तंत्रांद्वारे आपल्या मनाची काळजी घेण्यासाठी काही वेळ देण्याची गरज असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Pension Yojana : मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! अटल पेन्शन योजना २०३१ पर्यंत वाढवली; लाखो लोकांना मिळणार पेन्शन हमी

BMC: विरोधी पक्षात ३० वर्षांनी बदल! काँग्रेसचे पद जाणार; ठाकरे गट विरोधी पक्षनेत्याची डरकाळी फोडणार

'रुबाब'च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT