मुंबई

''अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे''

CD

''अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे''
कल्याणमध्ये बालवैज्ञानिकांचा उत्साह; प्राथमिक विद्यामंदिर शाळेत ७० प्रकल्पांचे सादरीकरण
कल्याण, ता. २१ (वार्ताहर): विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कर्णिक रोडवरील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत ‘अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे’ या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी ७० विविध प्रकल्पांचे सादरीकरण करून आपल्या वैज्ञानिक कौशल्याची चुणूक दाखवली. विद्यार्थ्यांनी सांघिक पद्धतीने विविध सामाजिक आणि वैज्ञानिक विषयांवर प्रकल्पांची मांडणी केली होती. यामध्ये मुख्यत्वे अन्न व आरोग्य, वायू प्रदूषण, वाहतूक व दळणवळण, मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती आदी प्रकल्पांचा समावेश होता.

उपक्रमाचे उद्घाटन धाकटे शहाडचे केंद्रप्रमुख रतिलाल चव्हाण व शीतल कोळी यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. सादर झालेल्या ७० प्रकल्पांपैकी उत्कृष्ट अशा चार प्रकल्पांची निवड संस्थेच्या अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांना प्रत्यक्ष कृती करून शिकण्याचा आनंद मिळतो. या प्रयोगातून भविष्यातील ''बाल वैज्ञानिक'' घडण्यास मदत होते आणि मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT